Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर बदलापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा तपास सुरु आहे.
Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर रेल्वे स्थानकावर आज संध्याकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूर स्टेशनवर संध्याकाळी 6च्या सुमारास एका इसमाकडून दोघांवर गोळीबार करण्यात आला. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी विकास नाना पगारे या तरुणाला अटक केली आहे. अहवालानुसार त्यानेच हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना-
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना
बदलापूर स्टेशनवर एका इसमाकडून दोघांवर गोळीबार#Badlapur #Firing #Crimenews pic.twitter.com/HQsyKe2LfG
— Lokmat (@lokmat) September 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2024 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

