Bombay High Court मध्ये 247 क्लर्क पदासाठी नोकर भरती, अशा प्रकारे उमेदवारांना करता येईल अर्ज
कारण बॉम्बे हायकोर्टात क्लर्कच्या 247 पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे.
Bombay High Court Clerk Recruitment: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बॉम्बे हायकोर्टात क्लर्कच्या 247 पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. बॉम्बे हायकोर्टाद्वारे 13 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटिसनुसार, या पदासाठी उमेदवारांना येत्या 6 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर या नोकर भरतीसंदर्भातील अधिक माहिती येथे आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बॉम्बे हायकोर्टात क्लर्क पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना 25 रुपये रजिस्ट्रेशन फी ही ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागणार आहेत. त्याचसोबत अधिकृत वेबसाइटवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 250 रुपये परिक्षेचा शुल्क ही भरावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत कंप्युटर टायपिंगचा बेसिक कोर्स किंवा इंग्रजी टाइपिंगमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असावे. उमेदवारांचा टायपिंग स्पीड कमीतकमी 40 शब्द प्रति मिनिट असावी. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय18 वर्षापेक्षा कमी किंवा 38 वर्षापेक्षा अधिक नसावे. तसेच आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना वयात सूट दिली जाणार आहे.