Thane Crime News: ठाण्यातील माटे चौकाजवळ सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरू
देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितलं की, आम्ही आवाहन केले आहे की, या अनोळखी व्यक्तीचे कोणतेही कुटुंब किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी प्राधान्याने ठाणे नगर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.
Thane Crime News: ठाण्यातील अमेरिकन वॉच कंपनीजवळ (American Watch Company) माटे चौकासमोर (Mate Chowk) स्टेशनकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर 38 वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. पुढील प्रक्रियेसाठी त्याला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच ठाणेनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, आम्ही अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केली आहे. अज्ञात व्यक्तीची वैशिष्ट्ये म्हणजे तो काळसर रंगाचा असून, नाक सरळ, काळे आणि पांढरे केस, काळी पांढरी दाढी आणि मिशा, सडपातळ बांधा, उंची 5 फूट 2 इंच आहे. मृत व्यक्तीने काळा हाफ टी शर्ट आणि काळी फुल पँट परिधान केलेली होती, असंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा -Murder Case: बीड मधून धक्कादायक घटना, धाकट्या भावानेच केला मोठा भावाचा खून)
देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितलं की, आम्ही आवाहन केले आहे की, या अनोळखी व्यक्तीचे कोणतेही कुटुंब किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी प्राधान्याने ठाणे नगर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.
दरम्यान, गेल्या आठवड्यात खारघर येथील तळोजा कारागृहाजवळील तलावात सीबीआयकडून चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क निरीक्षकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. पोलिसांनी कस्टम इन्स्पेक्टरची ओळख 38 वर्षीय मयंक सिंग अशी केली होती. त्यांच्या वाहनात एक सुसाईड नोट आढळून आली होती. याप्रकरणी खारघर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)