Leptospirosis आजाराच्या संसर्गाचा धोका, BMC ने नागरिकांना दिला इशारा
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मार्गदर्शन केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला जनजागृती आणि आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना आदेशाद्वारे दिल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसी (BMC) सतर्क झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक सखल ठिकाणी पाणी साचते आहे. काही ठिकाणी पाणी उताराच्या दिशेने संतपणे वाहत असते. अशा वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण या पाण्यातून चालताना शरीरावर जखमा असल्यास लेप्टोपायरसीस आजाराचा संसर्ग (Leptospirosis) होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मार्गदर्शन केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला जनजागृती आणि आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना आदेशाद्वारे दिल्या आहेत.
बीएमसीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देताना म्हटले आहे की, पावसामुळे वाहत्या पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे चिखलातून अथवा पाण्यातून पायी चालणाऱ्या व्यक्तींनी काही लक्षण आढळल्यास अथवा थोडीही शंका आल्यास 24 ते 72 तासांमध्ये वैद्यकीय उपचार घ्यावेत. तसेच व्यक्तिगत स्वच्छेतवर भर द्यावा. घरी गेल्यानंतर किंवा प्रवास थांबल्यावर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावेत. शक्य झाल्यास अंगोळही करावी. (हेही वाचा, Mumbai Rains and Epidemics: अनिश्चित पावसामुळे मुंबईत साथीचे आजार बळावले; डेंग्यू, लेप्टोपायरसीस रुग्णांमध्ये वाढ)
लेप्टोस्पायरोसिस हा एक दुर्मिळ जीवाणू संसर्ग प्राण्यांपासून होतो. खास करुन या आजाराचा संसर्ग उंदीर असलेल्या ठिकाणी, जनावराचे गोठे परिसरात होतात. या आजाराचे जीवाणू खा सरुन प्राण्यांच्या लघवीद्वारे पसरते, विशेषत: कुत्रे, उंदीर आणि शेतातील प्राण्यांपासून. अनेकदा या प्राण्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण हे प्राणी मोठ्या प्रमाणावर वाहक म्हणून काम करु शकतातत. लेप्टोस्पायरेसीची लागण त्वचेतील ओरखडे किंवा जखमा किंवा तुमचे डोळे, नाक किंवा तोंडातून होऊ शकते. लेप्टोस्पायरेमिक (तीव्र) टप्पा आणि रोगप्रतिकारक (विलंब) टप्पा. लेप्टोस्पायरेमिक टप्प्यात तुम्हाला सौम्य लक्षणे असू शकतात किंवा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही लोक रोगप्रतिकारक टप्प्यात गंभीर लक्षणे विकसित करतात.