BMC Khichadi Scam: अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळ्यामध्ये होणार चौकशी
तर मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटासोबत राहिला आहे.
बीएमसीचा कोविड काळातील खर्च याची सध्या चौकशी सुरू आहे. बीएमसी अधिकार्यांपासून माजी महापौरांपर्यंत सारेच सध्या चौकशीच्या रडार वर आहेत. यामध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai police’s Economic Offences Wing) कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ( Khichadi Scam) गुन्हा दाखल केला आहे. खिचडी घोटाळ्यामध्ये काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची चौकशी केली जाणार आहे.
Mumbai Economic Offenses Branch यापूर्वी कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये काहींची चौकशी करत आहे. यामध्ये ठाकरे गटातील काही नेते मंडळी आहेत. त्यात आता अमोल कीर्तीकर यांचा समावेश झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.
अमोल कीर्तीकर यांचे वडील खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले आहे. तर मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटासोबत राहिला आहे. नक्की वाचा: Covid Scam: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा, कोविड काळात 'बॉडी बॅग' प्रकरणाचा केला घोटाळा .
खिचडी घोटाळा म्हणजे मुंबईमध्ये लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी तत्कालीम सरकारने खिचडी वाटप केले होते. या कामगारांसाठी 52 कंपन्यांना बीएमसीने कॉन्ट्रॅक्ट दिले होते. पहिल्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट दिल्याचं बीएमसीचं म्हणणं आहे. त्यामुळे यात घोटाळा झाल्याच्या संशयावरून आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.