Covid Scam: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा, कोविड काळात 'बॉडी बॅग' प्रकरणाचा केला घोटाळा
आग्रीपाडा पोलीस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरुध्दांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
Covid Scam: कोविड घोटाळा प्रकरणांत मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर वेदांत इनोटेकचा 'बॉडी बॅग' घोटाळा ₹1500 ची डेड बॉडी बॅग ₹6,700 ला विकत घेतली.मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर आणि दोन एएमसीविरोधात एफआयआर नोंदवला. यापूर्वी ईडीने छापे टाकले होते. किरीट सोमया यांनी १३ जूलै रोजी पोलीसांत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या संदर्भात आणखी माहिती समोर यायची आहे. पोलीसांकडून चौकशी सुरू झाली आहे.
कोविड घोटाळ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pic.twitter.com/T5k8f0isor
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) August 5, 2023
COVID Ghotala
'Body Bag' Scam by Uddhav Thackeray Sena Leader Kishori Pednekar Vedant Innotech
₹1500 of Dead Body Bag bought at ₹6,700.
Mumbai Police registered FIR registered against Kishori Pednekar & AMC
earlier ED had conducted raids.
We filed complaint on 13 July pic.twitter.com/O94F2yCZoi
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 5, 2023
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 12:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

