BMC Elections 2022: ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद

हा बालेकिल्ला खेचून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. तर शिवसेनाही आपला बालेकिल्ला अधिक घट्ट करण्यासाठी कार्यरत आहे. शिवसेना-भाजप या संघर्षाला महाविकासआघाडीचीही झालर आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुंबई महापालिका निवडणूक 2022 (BMC Elections 2022) डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्ष (BJP) कामाला लागल्यावर आता शिवसेना (Shiv Sena ) सुद्धा सज्ज झाली आहे. शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरत मुंबईतील गुजराती मतदारांना साद ( Shiv Sena Strategy For BMC Elections 2022) घातली आहे. शिवसेनेने गुजराती (Gujarati Voters) मतदारांसाठी एक मेळावाही आयोजित केला आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) संबोधित करणार असल्याचीही चर्चा आहे.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा बालेकिल्ला खेचून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. तर शिवसेनाही आपला बालेकिल्ला अधिक घट्ट करण्यासाठी कार्यरत आहे. शिवसेना-भाजप या संघर्षाला महाविकासआघाडीचीही झालर आहे. राज्यात महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना भजप दरी अधिकच रुंदावली आहे. त्यामुळे हा संघर्ष येणाऱ्या काळात अधिक तीव्र होताना दिसू शकतो. (हेही वाचा, Shiv Sena in Uttar Pradesh For Panchayat Elections: शिवसेना उत्तर प्रदेश राज्यातही लढवणार पंचायत निवडणूक? मित्रपक्षांसोबत चाचपणी सुरु)

गुजराती बांधवांच्या मेळाव्याची जबाबदारी शिवसेनेने संघटक हेमराज शाह यांच्यावर सोपवली आहे. हा मेळावा येत्या 10 जानेवारीला जोगेश्वरी येथे पार पडणार आहे. त्यासाठी छापण्यात आलेले निमंत्रण पत्रं मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमध्ये छापण्यात आली आहेत. याच मेळाव्यात काही लोकांचे शिवसेना प्रवेशही पार पडतील असे सांगण्यात येत आहे.

वास्तविक पाहता मुंबई महापालिका निवडणुकीस आणखी बराच अवधी बाकी आहे. तोवरच भारतीय जनता पक्षाने मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी आमदार अतुल भातकळकर यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या वेळी भाजप मुंबई महापालिकेतील सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाने आगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनाही सावध झाली असून, कामाला लागली आहे.