मुंबई: गर्दीच्या निवडक ठिकाणी वाहनबंदी, 'बेस्ट' बस देणार मोफत सेवा; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न
या ठिकाणी मोटारसायकल/बाईक्सना पार्किग आणि वाहतुकीला बंदी घालून त्या भागात 5 किमी पर्यंत बेस्ट बसचा प्रवास मोफत देण्यावर प्रशासन विचार करत आहे.
मुंबई शहरात येत्या काही आठवड्यांमध्ये मान्सूनचं आगमन होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिका प्रशासन सध्या विविध पर्याय तपासून पाहत आहे. अशामध्ये सध्या मुंबईत 29 उड्डाणपुलांजवळ दुरूस्तीची कामं सुरू आहेत. या ठिकाणी मोटारसायकल/बाईक्सना पार्किग आणि वाहतुकीला बंदी घालून त्या भागात 5 किमी पर्यंत बेस्ट बसचा प्रवास मोफत देण्यावर प्रशासन विचार करत आहे. नाल्यांंमध्ये कचरा टाकणार्यांना होणार पोलिस आणि दंडात्मक कारवाई; BMC चा नवा प्लॅन
आज पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. गर्दीच्या ठिकाणी, बाजरांसारख्या ठिकाणी बेस्ट बसचा मोफत प्रवास देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. Google Maps चे नवे फिचर; प्रवासादरम्यान गाडी चुकीच्या रस्त्याने गेल्यास मिळेल Off Route Alter
पालिकेने यंदा मुंबईत सुमारे 180 जागांवर पाणी साचण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीसोबतच अपघात होण्याचं प्रमाणदेखील अधिक असतं.