Lok Sabha Elections 2019: नितीन गडकरी आज भरणार उमेदवारी अर्ज; नागपूर मध्ये भव्य रॅली (Watch Video)

मात्र त्यांनी यावर चर्चांवर पूर्णविराम लावला होता.

Nitin Gadkari (Photo Credits: Twitter )

यंदा नागपूर लोकसभा मतदार संघातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) विरूद्ध नाना पटोले (Nana Patole)  यांच्या विरुद्ध रंगणार आहे. आज भाजपाकडून नितीन गडकरी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत. नितीन गडकरींसोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित आहेत. आज सकाळी संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून नितीन गडकरी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत. दरम्यान नागपूरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ: नितीन गडकरी यांच्या होम पिचवर नाना पटोले विजयाचा सिक्सर मारणार का? लोकसभा निवडणूक 2019 - आव्हाने आणि जमेच्या बाजू

बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन

नितीन गडकरींची रॅली

नितीन गडकरी यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी विजयी होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला आहे. भाजपा सरकारमध्ये मोदीसरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन बाहेर पडलेले नाना पटोले आता नितीन गडकरींच्या विरोधात उभे राहिले आहेत. मात्र नितीन गडकरींनी प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान स्वीकारत विजयाचा विश्वास दर्शवला आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

नितीन गडकरींची प्रतिक्रिया 

मागील काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये होते. मात्र त्यांनी यावर चर्चांवर पूर्णविराम लावला होता. आज पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif