एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा; Devendra Fadnavis मख्यमंत्री व्हावेत, भाजप प्रदेशाध्यक्षांची भूमिका
धक्कादायक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला लागणारा सुरुंग हा विरोधकांकडून नव्हे तर त्यांचेच सत्तासहभागी मित्र भाजपकडून लागण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भलेही राज्याचे मुख्यमंत्री असले तरी लवकरच त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागणयाची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला लागणारा सुरुंग हा विरोधकांकडून नव्हे तर त्यांचेच सत्तासहभागी मित्र भाजपकडून लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: जरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असे वारंवार सांगितले असले तरीसुद्धा या चर्चा उघडपणे घडू लागल्या आहेत. याला निमित्त ठरले आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेले एक विधान. 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजेत', असेच स्पष्ट विधान बावनकुळे यांनी केले आहे.
पूर्व नागपूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले आहे. 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजेत', असे विधान जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते हे विशेष. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ज्या ज्या समाजावर अन्याय झाला आहे आणि जो जो समाज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे. त्या सर्व समाजाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:वर घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि मी प्रदेशाध्यक्ष पदावर असताच फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्राचे भविष्य हे केवळ देवेंद्र फडणवीसच बदलू शकतात, असेही बावनकुळे म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis: महाविकास आघाडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्त्युत्तर म्हणाले.. )
शिवसेना पक्षातील सर्वोच्च पदावरअसलेल्या आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून, शिवसेनेत वेगळा गट स्थापन करुन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे किती काळ मुख्यमंत्री पदावर राहतात याबातब उत्सुकता होती. आता तर खुद्द भाजपमधूनच एकनाथ शिंदे यांना मख्यमंत्री पदावरुन खाली खेचण्याची तयारु सुरु झाली आहे की, काय अशी चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंर या चर्चेला विशेष बळकटी मिळू लागली आहे.