Shiv Sena Vs BJP: 'हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक' भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा विरोधकांना टोला

शिवसेनेने (Shiv Sena) या मुद्द्यावरून भाजपावर (BJP) टीका केली असताना आता त्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आज शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credit: Twitter)

अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. शिवसेनेने (Shiv Sena) या मुद्द्यावरून भाजपावर (BJP) टीका केली असताना आता त्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आज शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. याचपार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक आहेत. यात आता ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची भर पडली आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे

शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. "राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे...हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा...वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे", असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Shiv Sena Bhavan: सेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर निलेश राणे यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

ट्वीट-

नेमके काय झाले?

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेने केलेल्या टीकेवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर भाजपचे अनेक कार्यकर्ते थेट शिवसेना भवनासमोर आंदोलनासाठी दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले. ज्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला.

भाजप आणि शिवसेना कार्यकर्यांमध्ये शिवसेनाभवनासमोर झालेल्या राड्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली होती. दरम्यान, पोलिसांनी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.