भाजप नेते किरिट सोमय्या यांचे BMC ला पत्र, आयुक्तांनी COVID19 संबंधित जाहीर करण्यात आलेले परिपत्रक मागे घेण्याची मागणी
त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र विरोधकांकडून कोरोनाच्या परिस्थिती बाबत राज्य सरकारवर वारंवार टीका करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र विरोधकांकडून कोरोनाच्या परिस्थिती बाबत राज्य सरकारवर वारंवार टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सुद्धा आता मुंबई महापालिकेला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, 13 जूनला महापालिकेने जाहीर केलेल परिपत्रक मागे घ्यावे.(Coronavirus Updates: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, COVID-19 चा डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहचला)
महापालिकेने 13 जूनला एक परिपत्रक जाहीर करत असे म्हटले होते की, जे कोरोनाचे रुग्ण आणि नातेवाईक हायरिस्कमध्ये आहेत. त्याचे कोरोनासंबंधित रिपोर्ट त्यांना न सांगता खासगी लॅबने हे रिपोर्ट महापालिकेकडे सादर करावे असे म्हटले होते. त्याचसोबत कोरोनाचे निगेटिव्ह आलेले रिपोर्ट रुग्णांना द्यावेत असे ही परिपत्रकात म्हटले होते. परंतु यावरुन किरिट सोमय्या यांनी महापालिकेवर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी असे म्हटले आहे की, पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी लपवण्यासह फसवेगिरीचा हा प्रकार आहे. तसेच मुंबई महापालिकेने हे परिपत्रक मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे केली आहे.(Lockdown In Bhiwandi: भिवंडी येथे उद्यापासून 15 दिवसांचा विशेष लॉकडाऊन- महापौर प्रतिभा पाटील)
यापूर्वी सुद्धा किरिट सोमय्या यांनी मुंबईतील कोरोनाबाधितांची हेळसांड कशा पद्धतीने रुग्णालयात होत आहे याबाबत व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळी सुद्धा सोमय्या यांनी राज्य सरकारच्या या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 61587 वर पोहचला आहे. तसेच 3244 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत 31338 जणांची प्रकृती सुधारली आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथील करण्यात आले आहेत.