Devendra Fadnavis: भाजप सोडून कुणीही जाणार नाहीत, काहीजण उगाचच वावड्या उठवतात- देवेंद्र फडणवीस
त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपात आगामी काळात अनेकांचा प्रवेश होणार आहे. भाजप सोडून कुणीही जाणार नाही. परंतु, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असे सांगितले जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा होऊ शकतो. परंतु, दोन पक्ष एकत्रितपणे राजकीय जागेवर मावणे कठीण आहे. हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. त्या जागेत किती लोक मावतील? हे देखील एक महत्वाचे आहे. याशिवाय, आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचे एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही, हे त्यांना देखील माहिती आहे. भाजपाचे सर्व आमदार एकत्र असून चिंता करायची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Balasaheb Sanap Join BJP: बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', दोन वर्षांमध्ये बदलले तीन पक्ष
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपात प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने, भाजपाकडून शिवसेनेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे.