Ashish Shelar on Maharashtra Government: 'ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे'; शिवजयंतीच्या नियमावलीवरुन आशिष शेलार यांची टीका
यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राम कदम यांच्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
कोविड-19 (Covid-19) संकटाचा धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे यंदाच्या शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सवासाठी काही नियम ठाकरे सरकारने लागू केले आहेत. यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राम कदम (Ram Kadam) यांच्यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 'ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे' असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. (Ram Kadam on Maharashtra Government: शिवजयंती उत्साहात साजरी करु न दिल्यास तीव्र आंदोलनाचा राम कदम यांचा सरकारला पत्राद्वारे इशारा)
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलय बर का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर.. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा!अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!!"
आशिष शेलार ट्विट:
दरम्यान, 15 फेब्रुवारीपासून भायखाळा येथील राणीची बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा धागा पकडत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. यापूर्वी भाजप आमदार राम कदम यांनी शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करु न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यापूर्वी शिवजयंतीसाठी केवळ 10 जणांना एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र परिपत्रकात झालेल्या चुकीत दुरुस्ती करत 100 जणांना परवानगी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.