Ulhasnagar: उल्हासनगर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप नगरसेवकाला मारहाण
नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती.
केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर मंगळवारी (24 ऑगस्ट) शिवसेनेने (Shiv Sena) अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. याचदरम्यान, ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका भाजप नगरसेवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. उल्हासनगर महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या 12 कार्यकर्त्यांनी कौन्सिलर प्रदीप रामचंदानी (वय, 47) यांना कथितरीत्या मारहाण केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली आहे.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संतप्त शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांच्यावर शाई फेकली आणि 'त्याला मारून टाका' असे ओरडले. तर, इतरांनी त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. भाजपच्या उल्हासनगर युनिटने या हल्ल्याचा निषेध केला आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना अल्टिमेटम दिले आहे. हे देखील वाचा- मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष Gajanan Kale यांना Bombay High Court कडून दिलासा; 7 सप्टेंबर पर्यंत कारवाई पासून संरक्षण
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कामगारांविरोधात आयपीसी आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ आरोपींची ओळख पटली आहे. परंतु, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. यासंदर्भात पीटीआयने माहिती दिली आहे.