कोल्हापूर महापलिकेच्या सभागृहात भाजपचे कमलाकार भोपळे यांनी घेतले काँग्रेस नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे चुंबन
मात्र आज कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेची सभा वेगळ्याच कारणाने गाजली आहे.
राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभा हाणामारी किंवा बाचाबाची झाल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर सतत पडत असतात. मात्र आज कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेची सभा वेगळ्याच कारणाने गाजली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात भाजपचे (BJP) कमलाकार भोपळे (Kamalakar Bhopale) यांनी काँग्रेस (Congress) नगरसेवक शारंगधर देशमुख (Sharangadhar Deshmukh) यांचे चुंबन घेतले आहे. यामुळे सभागृहात घडलेला हा प्रकार अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्याला भाजप पक्षात जेवढा मान दिला जात नाही, तेवढा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिला जातो. त्यामुळे मी खुश आहे, असे म्हणत कमलाकर भोपळे यांनी सत्तारुढ पक्षातील शारंगधर देशमुख यांचे चुंबन घेतले आहे. दरम्यान, सभागृहात महिलाही उपस्थित होत्या. यामुळे अनेक पालिका सदस्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत आज विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी काँग्रेस नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. तसेच त्यांच्यात काहीतरी बोलणे सुरू होते. कोल्हापूर महापालिकेच्या कमलाकर भोपळे आणि शारंगधर देशमुख दोन्ही विरोधी पक्षातील नेते ऐकमेकांच्या शेजारी बसल्याने वृत्तपत्र फोटोग्राफर त्यांचा फोटो घेण्यासाठी सरसावले. त्यावेळी कमलाकर भोपळे यांनी भर सभागृहात शारगंधर देशमुख यांचे चुंबन घेतले. अचानक झालेल्या याप्रकरामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. हे देखील वाचा- मराठी शाळेत शिकल्याने मुंबई महापालिकेने नोकरी अर्ज नाकारला
ट्विट-
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात घडलेला प्रकार सोशल मडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच सभागृहात महिलादेखील उपस्थित असल्याने काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप यावर भाजप नगरसेवक कमलाकर यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.