भाजपला मोठा धक्का! लातूर महानगर पालिकेत बहुमत असतानाही काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी
लातूरच्या महापौरपदी (Latur Mayoral Election 2019) काँग्रेस पक्षाचे (Congress) विक्रांत गोजमगुंडे (Vikrant Gojamgunde) यांनी भाजपचे (BJP) शैलेश गोजमगुंडे (Shailesh Gojamgunde) यांचा 2 नगरसेवकांच्या फरकाने पराभव केला आहे. महापौरपदाची निवड करण्यासाठी 68 सदस्य उपस्थित होते. दरम्यान, विक्रांत गोजमगुंडे यांना 35 तर, शैलेश गोजमगुंडे यांना 33 नगरसेवकांनी मतदान केले आहे. धक्कादायक म्हणजे, भाजपच्या 2 नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लातूर महानगर पालिकेत बहुमत असतानाही काँग्रेसचे महापौराची निवड झाल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.