भंडारा, नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे नाना पटोले यांचे निर्देश
यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. याच कारणास्तव विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देशन दिले आहेत.
राज्यात सर्वत्र ठिकाणी पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढलेला दिसून येत आहे. तर हवामान खात्याने सुद्धा राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच दरम्यान आता भंडारा, नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. याच कारणास्तव विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.(Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता)
नाना पटोले यांनी पुरग्रस्त गावांना भेट दिली. त्यावेळी पटोले यांनी गावातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज, संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केला. पुरपरिस्थितीमुळे 6 हजार 844 शेतकऱ्यांच्या, 9 हजार 131 हेक्टर शेतीमधल्या पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ; जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण; Watch Video)
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात पाऊस नसला तरीही पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा सर्वाधिक फटका लाखांदूर व पवनी तालुक्यातील गावांना बसला आहे. त्याचसोबत अनेक गावांना पाण्याने वेढा घातल्याने दोन तालुक्यांमधील संपर्क जिल्ह्यांशी तुटला आहे. तसेच गावातील ग्रामस्थानी रात्री पासून पूराची परिस्थिती पाहता अन्न धान्य व इतर सामग्री सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठे नुकसान टळले असले तरीही पूर स्थिती कायम आहे. या पूर स्थितीचा फटका जिल्ह्यातील 40 गावांना बसला असल्याची प्राथमिक माहिती भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली आहे.