BEST बस ची सेवा सुरु होताच पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुफान गर्दी; सोशल डिस्टंसिंग चे तीन तेरा
महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Governemnt) कालपासून मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus) सेवा पुन्हा सुरु करण्यात आली, पहिल्याच दिवशी प्रवाशांची इतकी गर्दी झाली की या सर्व नियमांचे बहुतांशी ठिकाणी तीन तेरा वाजल्याचे समजत आहे. बस स्टॉप वर तसेच बस च्या आताही अनेकदा नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले होते.
महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Governemnt) कालपासून मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus) सेवा पुन्हा सुरु करण्यात आली, यावेळी 60 टक्के क्षमतेने बसच्या फेऱ्या सोडण्यात येणार, सोशल डिस्टंंसिंग (Social Distancing) साठी एकावेळी बस मध्ये केवळ 35 प्रवाशांना प्रवास नियम जाहीर करण्यात आले होते. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांची इतकी गर्दी झाली की या सर्व नियमांचे बहुतांशी ठिकाणी तीन तेरा वाजल्याचे समजत आहे. बस स्टॉप वर तसेच बस च्या आताही अनेकदा नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले होते. कालपासून अनेक खाजगी कार्यालये सुद्धा 10 % उपस्थिती सहित सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, या कार्यालयांच्या वेळा या कमी अधिक फरकाने एकच असल्याने एकाच वेळी ही गर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डोंबिवली येथील फडके रोड बस स्थानकात जवळपास 1 किमी लांब प्रवाशांनी रांगा लावल्या होत्या.याशिवाय कुर्ला बस डेपो, शिवाजी नगर, प्रतीक्षा नगर बस डेपो इथे सुद्धा मोठ्या संख्येत प्रवासी दिसून आले होते. Unlock 1: नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रवाशांसाठी 215 बसेसव्दारे 858 बस फेऱ्यांची सुविधा उपलब्ध
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)