ऐन दिवाळीत BEST कर्मचाऱ्यांची संपाची तयारी; 17 ऑक्टोबरला कामगार मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता

17 ऑक्टोबरला कामगार मेळावा आयोजित केले आहे. त्यामध्ये या संपाची घोषणा होऊ शकते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने या संपाची तयारी करण्यास सुरवातही केली आहे

BEST bus (Photo Credits: PTI)

मुंबईमधील लाईफलाईन म्हणून बेस्ट बस (BEST Bus) कडे पाहिले जाते. गेल्या काही आठवड्यांपूर्वी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. यातील काही मागण्या पूर्ण झाल्यावर या संपाला तूर्तास स्थगिती मिळाली होती. मात्र आता ऐन दिवाळीत बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. 17 ऑक्टोबरला कामगार मेळावा आयोजित केले आहे. त्यामध्ये या संपाची घोषणा होऊ शकते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने या संपाची तयारी करण्यास सुरवातही केली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी 9 ऑक्टोबरपासून संपाचा इशारा दिला होता, मात्र प्रलंबित मागण्या आणि नियम 13 रद्द करावा, याप्रकरणी औद्योगिक आणि कामगार न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे हा संप रद्द करून 17 ऑक्टोबरला संपाची भूमिका जाहीर करु, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. 31 मार्च 2016 रोजी बेस्ट कर्मचार्‍यांची वेतन कराराची मुदत संपली आहे. अजूनही बेस्ट कर्मचारी या वेतन कराराच्या प्रतीक्षेत आहेत. (हेही वाचा: नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर 'बेस्ट कामगारां'च्या बेमुदत उपोषणाला स्थगिती; गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलन सुरु)

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या –

> बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत तातडीने विलीन करावा

> सातव्या आयोगासह दिवाळी सानुग्रह अनुदान मिळावे

> तातडीने कामगार करावा

अशा मागण्यासाठी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 14 ऑक्टोबर रोजी याबाबत सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबरला मेळावा घेऊन संपाची भूमिका जाहीर केले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif