Beed Bus Accident: बीड मध्ये जामखेड-अहमदनगर मार्गावरील आष्टा फाटा जवळ भीषण बस अपघात

अपघातातील जखमींना जामखेड व आष्टी येथील शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति गंभीर जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Accident (PC - File Photo)

बीड (Beed) मध्ये जामखेड-अहमदनगर (Jamkhed Ahmadnagar) मार्गावरील आष्टा फाटा (Ashta Phata)  जवळ एक भीषण अपघात झाला आहे. ट्र्रॅव्हलच्या या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 25 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. 9 जखमींची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे 6 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुरेश धस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आष्टी फाट्याजवळील ट्रॅव्हल्सचा हा अपघात इतका गंभीर होता की त्यामध्ये जखमींना बाहेर काढताना यंत्रणेची कसरत होती. दरम्यान अपघातातील जखमींना जामखेड व आष्टी येथील शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति गंभीर जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. नक्की वाचा: Wardha Accident: वर्ध्यात ट्रॅव्हल्स पलटली; भीषण अपघातात १ जण दगावला, ८ प्रवासी जखमी .

अपघातग्रस्त बस ही सागर ट्रॅव्हल्सची होती. पहाटेच्या वेळी प्रवासी झोपेत असताना अचानक ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने मोठा अपघात झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. स्थानिकांनीही पुढे येऊन  मदत केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement