Baba Amte 105th Jayanti: वकिल ते ज्येष्ठ समाजसेवक, कुष्ठरोग्यांसाठी आधारस्तंभ असलेल्या बाबा आमटे यांच्याबद्दल खास गोष्टी!

वकिलीचं शिक्षण घेतलेल्या बाबा आमटे यांनी आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अर्पण केलं.

Baba Amte honoured with postage stamp in 2014. (Photo Credits: Wikimedia Commons)

Baba Amte  Jayanti 2019:  कुष्ठरोग्यांसाठी आधारस्तंभ असलेल्या बाबा आमटे (Baba Amte) यांची आज (26 डिसेंबर) 105 वी जयंती आहे. वकिलीचं शिक्षण घेतलेल्या बाबा आमटे यांनी आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अर्पण केलं. त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी चंद्रपूरामध्ये आनंदवन (Aanandvan) हा आश्रम सुरू केला आहे. बाबा आमटेंचा जन्म जमीनदार कुटुंबामध्ये झाला परंतू त्यांनी सुखवस्तू आयुष्याचा त्याग करून कुष्ठरोग्यांसाठी सेवा देण्याचं काम सुरू केलं. Google Doodle: कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलची Doodle साकारत मानवंदना.  

बाबा आमटे यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी