Auto-Rickshaw Overturns At Thane: चालकाला चक्कर आल्याने ऑटोरिक्षा उलटली; 4 वर्षीय मुलीसह 6 जण जखमी

रिक्षाचालक शिवकुमार जैस्वाल (50) हे भिवंडी, काल्हेर मार्गावरून ठाणे स्थानकाकडे जात होते. ऑटो चालवताना जयस्वाल यांना चक्कर आली आणि ती उलटली. अपघाताची माहिती मिळताच राबोडी पोलीस कर्मचारी आणि ठाणे शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

Auto-Rickshaw Overturns At Thane: चालकाला चक्कर आल्याने ऑटोरिक्षा उलटली; 4 वर्षीय मुलीसह 6 जण जखमी
Accident (PC - File Photo)

Auto-Rickshaw Overturns At Thane: ठाण्यातील राबोडी येथे शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ऑटोरिक्षा (Auto-Rickshaw) पलटी (Overturns) झाल्याने एका 4 वर्षीय मुलीसह सहा जण जखमी झाले. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (RDMC) ठाणेचे प्रमुख यासीन तडवी म्हणाले, ठाणे येथील पोलीस मैदानाजवळ ऑटो रिक्षा पलटी झाल्याची माहिती आम्हाला रात्री 8 वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात मिळाली.

रिक्षाचालक शिवकुमार जैस्वाल (50) हे भिवंडी, काल्हेर मार्गावरून ठाणे स्थानकाकडे जात होते. ऑटो चालवताना जयस्वाल यांना चक्कर आली आणि ती उलटली. अपघाताची माहिती मिळताच राबोडी पोलीस कर्मचारी आणि ठाणे शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा -Thane News: ठाण्यात इमारतीत पार्क केलेल्या BMW कारला भीषण आग, कोणीही जखमी नाही (Watch Video))

तडवी यांनी पुढे सांगितलं की, या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षात एका अल्पवयीन मुलीसह एकूण 5 प्रवासी प्रवास करत होते.

रिक्षाचालक शिवकुमार जैस्वाल (50) सृष्टी सचिन पाटील (4), शितल सचिन पाटील (30), स्नेहल मिश्रा (27), यश पाटेकर (29), विकास सिंग (24) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींच्या डोक्याला, खांद्यावर आणि मानेला दुखापत झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2023 05:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).