औरंगाबाद येथे बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या पीडित महिलेचा मृत्यू

या घटनेत पीडित महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली. महिलेने उपचारादरम्यान घाटी रूग्णालायत अखेरचा श्वास घेतला.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे बुधवारी एका 50 वर्षीय महिलेवर घरात घुसून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले होते.  या घटनेत पीडित महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली. महिलेने उपचारादरम्यान घाटी रूग्णालायत अखेरचा श्वास घेतला. यामुळे संपूर्ण देशातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संतोष सखाराम मोहिते असे याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. संतोष हा गावातील बिअर बारचा मालक आहे. पीडित महिला ही आपल्या घरात झोपली होती. दरम्यान, संतोषने रविवारी रात्री 11च्या सुमारास संबंधित महिलेचा दरवाजा वाजवला आणि घरात घुसला. त्यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या संतोषने पीडित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आहे. यात पीडित महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती होताच, ग्रामीण पोलिसांनी संतोषला अटक केली. हे देखील वाचा- वर्धा: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि पीडित महिला गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत आहेत. वैयक्तिक कारणांवरून दोघात वाद झाला आहे. यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. संतोषला न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.