अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या लीक झालेल्या चॅट्समध्ये पुलवामा हल्ला, बालकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख; अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला प्रश्न

रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले की, अर्णव यांना दोन वर्षांपूर्वी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्याची आधीपासूनच माहिती होती. ऐवढी संवेदनशील गोष्ट अर्णव यांना कळलीच कशी असा प्रश्न अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी मंगळवारी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

अनिल देशमुख यांनी अर्णव गोस्वामी आणि बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचे जे चॅट्स व्हायरल झाले आहेत त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती मिळवत आहोत असे म्हटले आहे. त्यामध्ये काही संवेदनशील गोष्टींचा ही उल्लेख करण्यात आल्याचे ही देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच बालकोट आणि पुलवामाच्या हल्ल्याबद्दल त्यांना कळले कसे याबद्दल ही अधिक तपास केला जात आहे. उद्याच्या बैठकीनंतर आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे.(Anil Deshmukh On Arnab Goswami Arrest: कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही; पोलिसांची कारवाई कायद्यानेच - महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख)

Tweet:

याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सरकारकडे रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या मध्ये झालेल्या कथित बातचीत संदर्भात तपास करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी अशी मागणी केली आहे. एनसीपीचे प्रमुख प्रवक्ता महेश तपासे माडियात व्हायरल झालेल्या त्या कथित संवादाबद्दल बोलत होते की, ज्यानुसार अर्णव गोस्वामी यांना बालकोट एअर स्ट्राइक बद्दलची काही गुप्त माहिती समजली होती.(Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये, सरकार त्यांची नियमांनुसार काळजी घेत आहे - छगन भुजबळ)

तपासे यांनी पुढे असे ही म्हटले की, हे अत्यंत स्तब्ध आणि हैराण करण्यासारखे आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधित माहितीचा वापर टीआरपीसाठी केला गेला. यासाठी अनिल देशमुख मंगळवारी बैठक घेणार असून चॅटगेटवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे स्पष्टीकरण मागणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने यामागील सुत्राचा तपास करावा आणि तत्काळ कार्यवाही करावी.