Army Recruitment Exam Paper Leak: सैन्य भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणी सहा जणांना अटक; राज्याबाहेर धागेदोरे असल्याचा संशय, तपास सुरु
28 फेब्रुवारी रोजी सैन्यात भरतीसाठी कॉमन प्रवेश परीक्षा होणार होती,
मिलिटरी इंटेलिजन्स (Military Intelligence) आणि पुणे पोलिसांनी (Pune Police) संयुक्त कारवाईत सैन्य दलात शिपाई भरतीसाठीचा (Army Recruitment) परीक्षा पेपर लीक (Paper Leak) करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी सैन्यात भरतीसाठी कॉमन प्रवेश परीक्षा होणार होती, पण पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. कॉमन प्रवेश परीक्षाच्या पेपर लीक प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने सैन्यातही काम केले आहे. ही प्रश्नपत्रिका फोडून सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना विक्रीचा प्रयत्न झाला होता.
याप्रकरणी पुणे पोलिसांनीही एफआयआर नोंदविला आहे. पुणे पोलिसांचा असा विश्वास आहे की, या प्रकरणात लीक झालेला पेपर 1 ते 3 लाख रुपयांना विकला गेला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, सकाळी 11 वाजता ही परीक्षा होणार होती, परंतु सुमारे एक तासापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या फोन कॉलच्या तपशिलात प्रश्नपत्रिकेची माहिती देण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. पोलिसांच्या कारवाईनंतर भरती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे गुप्ता म्हणाले. दोन्ही एजन्सींनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये संयुक्त कारवाई करून पाच जणांना अटक केली. (हेही वाचा: UGC NET Exam 2021: यूजीसी-नेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, कुठे भराल अर्ज?)
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून या टोळीत सामील झालेल्या इतरांचा शोध घेण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. यासंदर्भात विश्रांतवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, मुख्य आरोपींना पकडण्यासाठी दोन ते तीन जिल्ह्यात चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अन्य राज्यातही असल्याची माहिती मिळत असून, तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. पुण्यासह देशातील 40 परीक्षा केंद्रावर सैनदलाच्या रिलेशन आर्मी शिपाई भरतीची परीक्षा 28 फेब्रुवारीला होणार होती. संबंधित परीक्षेला देशभरातून 30 हजार विद्यार्थी बसले होते.