Anil Deshmukh Active: अनिल देशमुख सक्रीय; कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र

ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला.

Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) आणि सीबीआय (Piyush Goyal) या केद्रीय संस्थांच्या अटकेत प्रदीर्घ काळ राहिलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आता सक्रीय झाले आहेत. ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला. त्यानंतर पुरेशी विश्रांती घेतल्यावर अनिल देशमुख आता सक्रीय झाले आहेत. अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाला (Cotton Price) प्रतिक्विंटल 10 हजार रुपये इतका भाव मिळावा असे म्हटले आहे. आजघडीला कापसाला प्रति क्विंटल 6380 इतका भाव मिळतो. जो भलताच कमी असल्याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला जाहीर केलेली MSP शेतकऱ्यांना परवडण्यापलीकडे आहे. या एमएसपीमधून शेतकऱ्याने घातलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने विचारात घ्याव्यात. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कापूस दरात वाढ करावी अशी मागणी देशमुख आपल्या पत्रात करतात. तसेच, कापसाच्या किमतीमध्ये वारंवार होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत असल्याचे देशुमख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh Released From Jail: अनिल देशमुख अखेर 13 महिन्यांनंतर तुरूंगाबाहेर; मुंबईत NCP कडून जल्लोषात स्वागत)

कापसाच्या किमतीत वारंवार घट होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. दुष्काळ, गारपीट आणि इतर अनेक समस्यांमुळे आगोदरच ग्रासलेला शेतकरी शेतमालांच्या किमतीत घसरण झाली तर आणखीच गर्तेत जातो. त्यामुळे सरकारने शासन पातळीवरच काही प्रयत्न करावेत जेणेकरुन शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळेल.