Pune Crime News: पुण्यात Whatsapp च्या ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागात कर्मचाऱ्याने बॉसला केली मारहाण, तक्रार दाखल
कर्मचाऱ्याने याच गोष्टीचा राग मनात धरात बॉसची मारहाण केली आहे.
Pune Crime News: पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान काही क्षुल्लक गोष्टींवरून देखील भांडण होताना पाहायला मिळतात. पुणे शहरात चक्क व्हॉटअॅपच्या ग्रुपमधून काढून टाकल्याने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील एका कंपनीतील कर्मचाऱ्याला काही कारणास्तव व्हॉटअॅपच्या (Whatsapp) ग्रुपमधून काढून टाकले. कर्मचाऱ्याने याच गोष्टीचा राग मनात धरात बॉसची मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर कंपनीतील वस्तूची तोडफोड सुध्दा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चंदन नगर परिसरातील जुना मुंढवा रोड येथील एका कंपनीत घडली आहे. हा सर्व प्रकार १ डिसेंबर रोजी घडला. या प्रकरणी कंपनीचे मालक अमोल शेषराव ढोबळे यांच्यावर मारहाण करण्यात आली आहे. अमोल यांनी पोलिसांत या घटनेअंतर्गत तक्रार केली आहे. अमोल यांची इन्स्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनी असून त्यांच्याच कंपनीतील कर्मचारी सत्यंम शिंदवी याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा-ऑनलाईन पेमेंट कंपनीची दोघांनी केली फसवणूक,
सत्यम हा इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनीत काम करतो. काही दिवसांपासून कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वागणूक योग्य वाटत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अमोल कडे तक्रार केली होती. या संदर्भात त्याच्यासाठी बोलण्यासाठी अमोलने अनेकदा कॉल केले होते. परंतु त्याच्याकडून काही उत्तर येईना. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याने काहीच रिप्लाई दिला नाही. यामुळे अमोल ढोबळे याने सत्यमला कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले.
यानंतर सत्यम प्रचंड रागावला आणि रागाच्या भराच ऑफिसमध्ये गेला आणि बॉसच्या केबिनमध्ये घुसून, ग्रुपमधून का काढला याची विचारणा केली. त्यानंतर विचारणा करता करता त्याला बांबून मारहाण केली. सर्व कर्मचाऱ्यांसमोरचं कंपनीच्या मालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्याने ऑफिसमधील सामानांची तोडफोड केली आणि अमोल यांच्या महागडा आयफोनही तोडला. या सर्व घटनेची माहिती अमोलने पोलिसांना दिली.