Andheri East By Polls: अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी आज Rutuja Latke अर्ज भरणार

राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाकडून ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यानंतर आज त्या अर्ज भरणार आहेत.

Rutuja Latke | PC: Twitter

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील काही दिवस ऋतुजा लटके (Rutuja Latke)  यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगत होत्या. राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाकडून ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यानंतर आज त्या अर्ज भरणार आहेत.

ऋतुजा लटके या महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर कार्यरत होत्या. त्यांना प्रशासकीय सेवेतून मुक्तता मिळाल्याशिवाय अर्ज भरण्याची मुभा नव्हती. महापालिकेच्या कार्यालयातून त्यांना मुक्तता मिळावी त्या मागील काही दिवस आयुक्तांची भेट घेत होत्या. न्यायालयात त्यांनी याप्रकरणी दाद मागितल्यानंतर आज 11 वाजेपर्यंत राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 3 वाजेपर्यंतची मुदत असल्याने त्याच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. नक्की वाचा:  निवडणूक चिन्ह देताना पक्षपातीपणा केल्याचा Uddhav Thackeray यांचा आरोप; Election Commission ला लिहिले पत्र.

कोर्टाने काल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांच्या गटातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. ऋतुजा लटकेंनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान शिंदे गटाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याच्या देखील बातम्या समोर येत होत्या पण त्यांनी त्या धुडकावून लावून आपण 'मशाल' चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं.

अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. अद्याप शिंदे गटाकडून  आपला उमेदवार जाहीर झालेला नाही. ही जागा शिंदे गट लढणार की भाजपा याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या जागी भाजपाचे मुरजी पटेल निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. 3 नोव्हेंबरला या जागेवर निवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif