शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांच्याकडून भावनिक ट्विट

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात अनेक हालचाली घडल्यानंतर अखेर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (ShivSena-NCP-Congress) यांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची एकमताने निवड झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांच्याकडून भावनिक ट्विट
Supriya Sule (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात अनेक हालचाली घडल्यानंतर अखेर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (ShivSena-NCP-Congress) यांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची एकमताने निवड झाली आहे. त्यानुसार, आज उद्धव ठाकरे शिवतिर्थावर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे हे सर्व पाहायला हवे होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत केले जात आहे. महत्वाचे म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबियांचा पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे. यातच सुप्रिया यांनी केलेले ट्वीट लक्ष केंद्रीत करणारे ठरले आहे. "माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल". असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हे दखील वाचा- उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री-मीडिया रिपोर्ट

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट-

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मैत्री आणि राजकारण वेगवेगळी ठेवले होती. सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राज्यसभा निवडणुक लढवली होती. ज्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत होत्या. त्या मतदारसंघातून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सुप्रिया माझ्या मुलीसारखी आहे. ती स्वत: निवणुकीला उभी राहतेय त्यामुळे तिच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठामपणे सांगितले होते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2019 02:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).