फडणवीस सरकारच्या 'मनोधैर्य' योजनेच्या सवलती हिंगणघाट घटनेतील पीडिता अंकिता द्याव्या- अमृता फडणवीस
नागपूरमध्ये हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण या दोन्ही घटना ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
हिंगणघाट घटनेचा सर्वच स्तरातून जोरदार निषेध व्यक्त होत आहे. महिलांवारील अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असून त्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांकडून होत आहे. त्याच धर्तीवर अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. ही घटना खूपच लज्जास्पद असून फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या 'मनोधैर्य' योजनेचा सर्व सवलती पीडित अंकिताला देण्यात याव्या अशी मागणी त्यांना केली आहे. तसेच महिला आयोग अध्यक्षाचे पदही लवकर भरण्यात यावे असेही त्या म्हणाल्या आहेत. तसेच या माध्यमातून "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरं स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण करा," असे टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 अॅसिड अटॅकच्या दुदैवी घटना घडल्या आहे. नागपूरमध्ये हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण या दोन्ही घटना ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
पाहा अमृता फडणवीस यांचे ट्विट:
हेदेखील वाचा- हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मृत्यूशी झुंज देण्याऱ्या पीडित तरुणीला मुख्यमंत्रीनिधीतून मदत जाहिर
महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भरण्यात यावे असा सल्ला देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले (Amruta Fadnavis tweet) आहेत.
आरोपीवर लवकरात लवकर कडक शासन करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केले होते. जे पोलीस किंवा अधिकारी या कामात टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.