Amruta Fadnavis Tweet: कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार विषाणू यांपासून दूर राहा- अमृता फडणवीस
केव्हा, कोठे कसे गरीबावर आक्रमन करतील सांगता येत नाही. क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:हून दूर राहा. तोंडावर सतत मास्क लावा. सुरक्षीत राहा... गप्प राहा, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतात फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना व्हायरस आणि पेग्विन (Penguin) महा सरकार (Government ) दोन्ही व्हायरस आहेत. केव्हा, कोठे कसे गरीबावर आक्रमन करतील सांगता येत नाही. क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:हून दूर राहा. तोंडावर सतत मास्क लावा. सुरक्षीत राहा... गप्प राहा, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी समित ठक्कर नामक व्यक्तीला शनिवारी अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारीत केल्याच्या आरोपाखाली समित ठक्कर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांच्या या कारवाईबाबत आनंद रंगनाथन यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली. समित ठक्कर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पावरलेस मुख्यमंत्री म्हटले होते. त्यामुळेच समितला अटक करण्यात आली काय? असा प्रश्न रंगनाथन यांनी विचारला होता. (हेही वाचा, Amruta Fadnavis On Eknath Khadse: खात्री बाळगा, अशी चूक करणार नाही; अमृता फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांना टोला)
आनंद रंगनाथन यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत अमतृा फडणवीस यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार दोन्ही व्हायरस आहेत. केव्हा, कोठे कसे गरीबावर आक्रमन करतील सांगता येत नाही. क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:हून दूर राहा. तोंडावर सतत मास्क लावा. सुरक्षीत राहा... गप्प राहा, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरुन राजकीय नेत्यांविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे. सेलिब्रेटींना ट्रोल करणे. तसेच हे करत असतान आक्षेपार्ह भाषेचा वापर सातत्याने करणे. जाणीवपूर्वक अश्लिल सामग्री पसरवणे, फोटो मॉर्फ करुन लोकांची दिशाभूल करणे यांसारख्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना आणि अशा गोष्टी करणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.