Video : ‘मस्तानी हो गई' गाण्यावर अमृता फडणवीस यांचा नृत्याविष्कार
त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या ‘मस्तानी हो गई’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत
राज्याच्या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अभिनय, गायन यांसोबतच एक फॅशनिस्टा म्हणूनही त्यांच्याकडे पहिले जाते. आता अमृता फडणवीस यांनी आपले नृत्याचे कौशल्यही जनतेला दाखवले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या ‘मस्तानी हो गई’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यावेळी त्यांची मुलगी दिविजानेही त्यांना साथ दिली आहे. याआधी विविध अल्बम्समधून आपण अमृता फडणवीस यांना पहिले आहे, मात्र अशा प्रकारे नृत्य करताना त्या पहिल्यांदाच जनतेच्या समोर आल्या आहेत.
हा व्हिडीओ एका कौटुंबिक विवाहातील संगीत कार्यक्रमाचा आहे. व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये माझ्या लाडक्या मुलीसोबत कौटुंबिक विवाह संगीत कार्यक्रमात नृत्य सादर करायला मिळाल्याचा आनंद आहे असे लिहिले आहे. दोघींनी एकाच प्रकारे कपडे घातले आहे. दोघींच्याही स्टेप्स आणि एकमेकींचा ताळमेळ पाहता या नृत्यासाठी दोघींनी आधी भरपूर तयारी केली असावी असे दिसून येते.
फक्त मुख्यमंत्र्यांची पत्नी बनून न राहता, अमृता फडणवीस यांनी स्वतःच्या आवडीच्या अनेक गोष्टींमधून आपली वेगळी ओळख जगासमोर मांडली आहे. आता पहिल्यांदाच त्या अशाप्रकारे नृत्य करताना दिसल्या आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे.