छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का? मनसे नेते अमेय खोपकर यांचा नवाब मलिकांना सवाल
यामध्ये सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक मात्र शांत उभे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनसे नेते अमेय खोपकर तसेच शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का? असा सवाल अमेय खोपकर यांनी नवाब मलिक यांना केला आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून नवाब मलिक यांचा तो व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक मात्र शांत उभे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) तसेच शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का? असा सवाल अमेय खोपकर यांनी नवाब मलिक यांना केला आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून नवाब मलिक यांचा तो व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर रायगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, विद्या चव्हाण उभे राहिले आहेत. तसेच धनजंय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत. धनजंय मुंडे यांच्यासोबत सर्वचं नेते शिवरायांचा जयघोष करताना दिसत आहेत. मात्र, केवळ नवाब मलिक फक्त हातावर हात ठेवून उभे राहिलेले दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. (हेही वाचा - अकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू)
नवाब मलिक यांच्या या कृतीवर अमेय खोपकर चांगलेचं आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नवाब मलिक यांच्यावर तोफ डागली आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'आमचे असंख्य मुस्लिम बांधव आहेत. ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की असं ओरडलं की ते आनंदाने 'जय...' अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? आमच्या महाराजांचा जय जयकार करण्यात त्यांना कमीपणा वाटतो काय? असा सवाल ही खोपकर यांनी केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट 'जाणता राजा' संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा संतप्त सवालही अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.