Covid-19 Vaccination: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश- आरोग्यमंत्री राजेश टोपे

येत्या 2-3 महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा अनेक रिपोर्ट्समधून देण्यात आला आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम आहे. येत्या 2-3 महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा अनेक रिपोर्ट्समधून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवणे गरजेचे आहे. दरम्यान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. (COVID-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा NIDM कडून इशारा; लहान मुलांसाठी धोक्याची शक्यता)

त्याचबरोबर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आम्ही 1200 डॉक्टरांची भरती करत आहोत. तसंच आम्ही 7,000 अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करु. ऑक्सिजनचे उत्पादन आणि हॉस्पिटल बेडची संख्या वाढवत आहोत. 1000 नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

ANI Tweet:

(लहान मुलांच्या लसीकरणाबाबत नीति आयोगाच्या आरोग्य आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली महत्वाची माहिती, पहा व्हीडिओ)

दरम्यान, तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीतून दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम असून आपण मोठ्या प्रमाणवर लसीकरण करु शकतो, असा विश्वास टोपे यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केला होता. तसंच केवळ लस उपलब्ध नसेल तेव्हात लसीकरणाला ब्रेक लागतो, हे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.