अकोला: वंचित बहुजन आघाडीत मोठा भूकंप; माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48 सदस्यांनी दिला सामूहिक राजीनामा

अकोला (Akola) जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का लागला असून माजी आमदार हरिदास भदे (Haridas Bhade), बळीराम सिरस्कर ( Baliram Sirskar) यांच्यासह 48 सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का लागला असून माजी आमदार हरिदास भदे (Haridas Bhade), बळीराम सिरस्कर ( Baliram Sirskar) यांच्यासह 48 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचीही चिंता वाढण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, या निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारिप- बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केले. आता पक्षातून विश्वासार्हता संपल्याने या दोन्ही पक्षात असलेल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48  पदाधिकाऱ्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर, वंचितचे महाराष्ट्र राज्य सचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह 48 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले अनेक पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत सुरुवातीपासून कार्यरत आहेत. विविध जाती जमातीमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश सुरुवाती पासूनच राहीला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. आज यातील मोठा गट बाहेर पडला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षातील विश्वासार्हता संपल्यामुळे राजीनामा देत असल्याचे या पदाधिकऱ्यांचे म्हणणे आहे. वंचितकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हे देखील वाचा-'भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न' व्हायरल व्हिडिओवर नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण

ट्वीट- 

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला अपयश आले होते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी 32 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. जर वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली असती तर, कदाचीत 32 ठिकाणाचे निकाल काही वेगळे असते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.