Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांच्यासह सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात; राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्याबाबत (Government Employees) मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता देशासमोर अर्थिक संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्याबाबत (Government Employees) मोठा निर्णय घेतला आहे. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वगळता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. यात मुख्यंमंत्री, मंत्री, आमदार यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. तसेच अजित पवार यांच्या वेतन कपातीच्या निर्णयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात वावरत असलेले कोरोना विषाणूचे संकट आणि संपूर्ण देशात घोषीत केलेल्या संचारबंदीमुळे अर्थिक उत्पदनात परिणाम होऊ लागला आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असेही अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सरकारी अधिकाऱ्यांना निम्मेच वेतन (50 टक्के कपात) दिले जाणार आहे. ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्क्यांची कपात होणार आहे. ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आली नाही. ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांचं आधीच वेतन कमी असून या कपातीने त्यांच्यावर अधिकचा आर्थिक ताण येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांना या वेतनकपातीतून सूट देण्यात आली आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर याचं प्रधानमंत्री सहायता निधीत 25 लाखांचे योगदान
Coronavirus: रामदास आठवले यांनी ट्वीट केली कविता ; हात जोडून देशवासीयांना केली विनंती : Watch Video
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. तसेच कोरोना विषाणुवर मात करण्यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण मुख्यमंत्री मदत निधीत अर्थिक मदत करत आहेत. यात कलाकार, खेळाडू, राजकीय नेते यांच्यासह सामान्य जनतेकडूनही हात भार लावला जात आहे.