Ajit Pawar यांनी Prakash Ambedkar यांच्यासोबत जावं; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा सल्ला
दस्तुरखूद्द अजित पवार यांना सल्ला देताना मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी (Ajit Pawar) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं. महायुतीमध्ये अजित पवार यांना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी स्वत:हून महायुती सोडून जावं यासाठी प्रयत्न होत आहेत. पण, तसे घडणार नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराने दिलेल्या सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर महायुतीत सगळेच काही अलबेल नसल्याचेही पुढे आहे. अमोल मिटकरी असे या आमदाराचे नाव आहे. दस्तुरखूद्द अजित पवार यांना सल्ला देताना मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी (Ajit Pawar) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadhi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं. महायुतीमध्ये अजित पवार यांना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी स्वत:हून महायुती सोडून जावं यासाठी प्रयत्न होत आहेत. पण, तसे घडणार नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
आमदाराच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
अमोल मिटकरी यांनी एबीपी माझा या खासगी वृत्तवाहीनिशी बोलताना म्हटले की, अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जावं हे माझं व्यक्तीगत मत आहे. पण, हे माझे व्यक्तीगत मत असले तरी, पक्ष पातळीवर त्यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिटकरी यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली नसती तरच नवल. (हेही वाचा, Amol Mitkari on Ramdas Kadam: दांदांची कृपा म्हणून लंगोट वाचली, अमोल मिटकरी यांचा रामदास कदम यांना टोला)
'अजित पवार यांना एकट पाडण्याचा प्रयत्न'
अधिक विस्ताराने बोलताना मिटकरी यांनी म्हटले आहे की, महायुतीमध्ये अजित पवार यांना एकट पाडलं जात आहे. विशेषत्वाने दोन मित्र हे प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांनी स्वत:हून महायुतीमधून बाहेर पढावे यासाठी काही लोक विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप करताना मिटकरी पुढे म्हणाले, मी सुरुवातीपासूनच अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे काम पाहात आलो आहे. अजित पवार आणि आंबेडकर हे एकत्र आले तर दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतील, असा मला विश्वास आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधला दुवा होण्याची संधी मिळाली तर ते मी आपले भाग्य मानेल असेही ते म्हणाले. (हेही वाचा, अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी केली: संघ मुखपत्रातून टीकास्त्र)
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली. स्वत: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा पराभव झाला. इतकेच नव्हे तर, रायगड येथून सुनिल तटकरे यांचा अपवाद वगळता त्यांच्या पक्षाला दुसरी एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन अजित पवार यांना मिळाले काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)