'पावसाळ्यात झाडे लावा, हिवाळ्यात दारु मोफत मिळवा', महापालिकेच्या अधिकाऱ्याला नोटीस
तर झाडे लावा आणि हिवाळ्यात दारु मोफत मिळवा अशी योजना आखण्यात आली.
पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमणात झाडे लागवड व्हावी यासाठी अहमदनगरच्या (Ahamadnagar) महापालिकेकडून एक नवी युक्ती सुचवली गेली. तर झाडे लावा आणि हिवाळ्यात दारु मोफत मिळवा अशी योजना आखण्यात आली. मात्र या योजनेवर आक्षेप घेतला असून महिपालिकेच्या अधिकाऱ्याला नोटीस धाडण्यात आली आहे.
पावसाळ्यात एक झाड लावा आणि हिवाळ्यात दारु मोफत मिळवा अशी युक्ती महापालिकेने लढवली. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉट्सअॅपवर अशा पद्धतीचा मेसेज आला होता. तर मेसेजमध्ये ही ऑफर फक्त मुकादमांसाठीच असल्याचे म्हटले होते.
या प्रकारानंतर व्हॉट्सअॅपवर मेसेजचा स्क्रिनशॉर्ट सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. मात्र महापालिकेच्या कर्मचारी युनिटने याबद्दल आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे अधिकाऱ्याला नोटीस धाडत याबद्दल बजावले असल्याचे म्हटले जात आहे.