IPL Auction 2025 Live

नारायण राणे, निलेश राणे यांचा भाजप पक्षप्रवेश; कोकणाच्या विकासासाठी पक्षांतर केल्याची व्यक्त केली भावना

यावेळेस नारायण राणे सह महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करण्यात आला आहे.

Narayan Rane | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज (15 ऑक्टोबर) दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचा आज कणकवली दौरा आहे. या दौर्‍यामध्ये नारायण राणे पुत्र नितेश राणे नंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आज अधिकृत भाजप प्रवेश झाला आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग येथील कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे (Nitesh Rane) हे भाजपाचे उमेदवार आहेत. यावेळेस नारायण राणे सह महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये  विलीन करण्यात आला आहे.

नितेश राणे यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेने आपला उमेदवार उतरवला आहे. शिवसेना आणि नारायण राणे यांचे वैर महाराष्ट्रात सर्वशृत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध; दुष्काळ, जलव्यवस्थापन, शेती यांसह विविध विषयांवर अश्वासनांचा पाऊस

देवेंद्र फडणवीस कणकवली सभा

भाजपा- शिवसेनेच्या युतीच्या विचारधारेसोबत काम करणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गाच्या प्रगतीसाठी, गतिमान वेगाने प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे नारायण यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान  नितेश राणे मोठा मताधिक्क्यांनी निवडून येतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यांना संयम ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.   21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.