Accident News: लेन बदलताना टँकर पलटी, 400 फूट दरीत कोसळला टेम्प; एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात; 1 जण जागीच ठार

ही घटना रायगड जिल्ह्यात (Raigad Accident News) घडली. तर दुसऱ्या घटनेत प्रवाशांनी भरलेला ट्रेम्पो तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai - Pune Expressway Accident )तीन वाहनांच्या झालेल्या विचीत्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण बालंबाल बचावले. ही घटना रायगड जिल्ह्यात (Raigad Accident News) घडली. तर दुसऱ्या घटनेत प्रवाशांनी भरलेला ट्रेम्पो तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला. हा टेम्पो आणि त्यातील प्रवाशांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. ही घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar Accident) येथील आंबेनळी घाटात घडली. ऐन धुलीवंदनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने अपघातग्रस्तांच्ये कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये रंगाचा बेरंग झाला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघात कार दूध टँर आणि एका वाहनाचा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला दूध टँकर खोपोली हद्दीतील बोर घाट उतरत होता. या वेळी लेन बदलत असताना टँकरला झोला बसला आणि तो एका बाजूला कलंडला. दरम्यान त्याने महामार्गावरुन जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये कारचा चक्काचूर झाला. दुसऱ्या बाजूला टँकरमधील दूध रस्त्यावर सांडले. अपघातामुळे बराच काळ लेनवरील वाहतूक बंद होती. ही घटना आज (सोमवार, 25 मार्च) दुपारी घडली. दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना कळताच त्यांनीतातडीने घटनास्थळी हजेरी लावली. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्ववत केली. (हेही वाचा, Mahabaleshwar News: सेल्फी काढताना दरीत कोसळून महिलेचा मृत्यू, महाबळेश्वर येथील घटना)

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे मोठा अपघात घडल्याचे वृत्त आहे. ऐन धुलीवंदनाच्या प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो चक्क 400 फूट खोल दरीत कोसळा. ही घटना टतळे या गावाजवळ आंबेनळी घाटात घडली. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहती पोलीस आणि स्थानिक प्रशासनालाही देण्यात आली आहे. दरम्यान, टेम्पोत किती लोक होते. ते कोण होते. हा टेम्पो नेमका कुठला आहे, तो कुठून आला आणि कोठे निघाला होता याबाबत माहिती समजू शकली नाही. (हेही वाचा, Jalgaon Accident: जळगावात भाविकांच्या कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी)

धुलिवंदनाच्या दिवशी अनेक नागरिक मद्यपाण आणि विविध नशिल्या पदार्थांचे सेवन करतात. त्यातील काही लोक नशेत असताना वाहनेही चालवतात. अशा वेळी अपघात होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीचे वर्तन करावे, असे अवानह पोलिसांकडून केले जाते. त्यासोबतच अपघात टाळण्यासाठी रहदारीचे नियम चालकांनी पाळावेत, लेन बदलत असताना विशेष काळजी घ्यावी, असे अवाहनही पोलीस करत असतात. तरीही अपघाताच्या घटना घडत असतात हे दुर्दैव.