Aarey Protest: आरे वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 7 ऑक्टोंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

तसेच विरोधकांकडून सुद्धा आरे मधील मेट्रोसाठी (Metro) कापण्यात आलेल्या झाडांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांनी शिवसेनेकडे महानगरपालिका असून ही काही करत नाही आहेत.

Supreme Court | File Image | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) आरे कॉलनी (Aarey Colony) परिसराती झाडे तोडण्यावरुन पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. तसेच विरोधकांकडून सुद्धा आरे मधील मेट्रोसाठी (Metro) कापण्यात आलेल्या झाडांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांनी शिवसेनेकडे महानगरपालिका असून ही काही करत नाही आहेत. उलट भाजपच्या समोर हात टेकल्याची टीका करण्यात आली. तर उद्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दुसऱ्या बाजूला रविवारी झाडे कापण्यात आल्याच्या विरोधात आंदोलन केलेल्या 29 आंदोलकांना बेल देण्यात आले आहे. शनिवारी आरे वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांपैकी काही जणांची मुंबई पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. मात्र आता सुटका केली असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु झाडे तोडण्याच्या विरोधात अद्याप ते संपात व्यक्त करत आहेत.(Mumbai Metro Car Shed: पर्यावरणप्रेमींना झटका; 'आरे कॉलनी' बाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर ताबडतोब झाडे तोडण्यास सुरवात Watch Video)

ANI Tweet: 

मेट्रो 03 च्या प्रकल्पासाठी आरेतील 2 हजारहून अधिक झाडे तोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आक्षेप घेत पर्यावरण प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. परंतु 4 ऑक्टोबरला न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि भारती यांच्या खंडपीठातून 'आरे हे जंगल नाही' असे म्हणत मेट्रोच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरापासून परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर रविवारी सुद्धा आंदोलन सुरुच राहिले होते.

दरम्यान, सरकारच्या योजनेनुसार कापलेल्या झाडांऐवजी नवीन झाडे लावण्याचीही योजना आहे. शहरातील वाढती रहदारीची समस्या आणि मुंबईच्या गरजेसह सहजगत्या वाढणार्‍या गाड्यांची संख्या रोखण्यासाठी मेट्रो बांधकाम हा एक मार्ग आहे. अनेक लोकांनी त्याचे स्वागतही केले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही भविष्यातील चांगली सोय असल्याचे म्हटले आहे.