Aarey Protest: आरे परिसरात कलम 144 अजूनही कार्यरत; मात्र स्थानिकांना वावरताना कोणताही त्रास होणार नाही- मुंबई पोलीस
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत माहिती देत, उद्या सकाळपर्यंत या परिसरात जमावबंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. असं असलं तरीही आरे परिसरात स्थानिकांना वावरताना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) च्या प्रकल्पासाठी आरे परिसरात वृक्षतोड करण्यावरून पर्यावरणस्नेही मंडळींनी मागील एकही दिवसांपासून अक्षरशः रान उठवले होते. आंदोलने, याचिका केल्यांनतर अखेरीस या वृक्षतोडीचा निषेधकर्त्यांना दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तूर्तास वृक्ष तोडीला स्थगिती दिली असली तरी आरे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 144 अंतर्गत अजूनही जमावबंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत माहिती देत, उद्या सकाळपर्यंत या परिसरात जमावबंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. असं असलं तरीही आरे परिसरात स्थानिकांना वावरताना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
'आरे'तील वृक्षतोड तत्काळ थांबवा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
ANI ट्विट
प्राप्त माहितीनुसार, आरे मधील वृक्षतोडीच्या निर्णयाला पाठिंबा देत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने आरे हे जंगल नाही असा निर्णय दिला होता, त्याच रात्री एकाएकी आरे मधील शेकडो झाडे कापण्यात आली .यानंतर आरे परिसरात अनेक पर्यावरण प्रेमींनी धाव घेत निषेध करत आंदोलने करण्यास सुरुवात केली होती, परिस्थितीची तीव्रता पाहता मुंबई पोलिसांनी या भागात कलम 144 लागू केला होता. परिणामी आरे मध्ये एका वेळी चार हुन अधिक व्यक्तींना जमण्यास मनाई करण्यात आली होती. या नियमाचे उल्लन्घन करणाऱ्या 29 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. Aarey Protest, शरद पवार ईडी चौकशी दिवशी लागू करण्यात आलेला जमावबंदी कायदा कलम 144 नेमका आहे तरी काय; जाणून घ्या सोप्प्या शब्दात
दरम्यान या सर्व प्रकारानंतर काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालय निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, या प्रकरणी आज सुनावणी नंतर वृक्षतोडीस स्थगिती दिली होती. येत्या 21 ऑक्टोबर रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातीळ प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुढील सुनावणी होणार आहे.