IPL Auction 2025 Live

Aapla Dawakhana: मुंबईत 227 ठिकाणी सुरु होणार 'आपला दवाखाना'; सामान्यांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे.

REpresentational Image (Photo credits: Unsplash.com)

मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई हे जगातील सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Timetable: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोने रात्री उशीरापर्यत प्रवास करण्याची मुभा, मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात मोठे बदल)

कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून  तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत 227 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती शहरे, वातावरणीय बदल यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.