Nalasopara: हनी ट्रॅपमध्ये अडकवत दिल्लीच्या तरुणीने नालासोपाऱ्यातील तरुणाकडे केली 50 हजारांची मागणी; तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात 'हनी ट्रॅप'च (Honey Trap) स्वरूप बदलले आहे. यापूर्वी 'हनी ट्रप' लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यायचे. मात्र, आता फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते. प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा एखाद्याला जाळ्यात अडकवले जाते.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात 'हनी ट्रॅप'च (Honey Trap) स्वरूप बदलले आहे. यापूर्वी 'हनी ट्रॅप' लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यायचे. मात्र, आता फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते. प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा एखाद्याला जाळ्यात अडकवले जाते. नालासोपाऱ्यातून (Nalasopara) अशाच एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या तरूणीने नालासोपाऱ्यातील एका तरूणाला हनी ट्रपमध्ये अडकवून त्याच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली आहे. मात्र, नकार मिळताच तरूणीने संबंधित तरूणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्यानंतर तरूणाने तुळींज पोलीस ठाण्यात (Tulinj Police Station) तक्रार दिल्यानंतर दिल्लीतील तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरूणाने तुळींज पोलीस ठाण्यात दिलेल्यानुसार, त्याची गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका तरूणीसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन व्हाट्सअपद्वारे चॅट करू लागले. त्यानंतर त्यांच्यात अश्लील चॅटिंगही सुरु झाले. एवढेच नव्हेतर, तरूणीने फिर्यादीला व्हॉट्सअॅपवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्यावेळी तिने तरूणाचे अश्लील व्हिडिओ सेव्ह केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तरूणीने त्याच्याकडे 50 हजारांची मागणी केली. मात्र, त्याने नकार देताच तिने हे व्हिडिओ त्याच्या मित्रांना पाठवले. अखेर हताश झालेल्या तरूणाने पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेत तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणाने तिथे गेल्यानंतर आपल्या सोबत घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तरूणीविरोधात गुन्हा दाखल करून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Thane: कोरोनाचे नियम पायदळी तुडवत ठाण्यात साजरा केला बैलाचा वाढदिवस; विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हनी ट्रॅप म्हणजे काय?
मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला 'हनी ट्रॅप' म्हणतात.
'हनी ट्रॅप' हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात 'हनी ट्रॅप' लावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2021 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

