Woman Hit By Railway Video: रुळ ओलांडताना महिलेला रेल्वेची धडक, RPF जवानाच्या चपळतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा Video व्हायरल

हा धोकादायक प्रयत्न कधी कधी जिवाशी बेतला जातो, अशीच एक घटना जळगावच्या रेल्वे स्थानकावर घडला.

Woman Hit By Run Photo Credit TWITTER

Woman Hit By Railway Video: रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे विभागाकडून पुलाचा वापर करवा असं सांगून ही अनेकदा प्रवाशी पूलावरून न जाता रेल्वे रुळावरून जाण्याचा प्रयत्न करतात. हा धोकादायक प्रयत्न कधी कधी जिवाशी बेतला जातो, अशीच एक घटना जळगावच्या रेल्वे स्थानकावर घडला. महिला सामान घेऊन रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भरधाव रेल्वे स्थानकावर येते. प्रसांगवधान राखत आरपीएफ जवानाने महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल)

महाराष्ट्रातील जवगाळ रेल्वे स्थानकावर भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने महिलेला धडक दिली. या अपघाताच्या वेळी महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धाडसी आरपीएफ जवानांनी धाव घेतली आणि तीला वाचवण्याचा प्रयत्न केल. ही घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी घडली. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला सामान घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढत होती. तेवढ्यात ती खाली अडकली. तेवढ्यात समोरून भरधाव रेल्वे आली. हे पाहून आरपीएफ अधिकाऱ्यांनी तीला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिलेला रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेचत असताना रेल्वेने महिलेला धडक दिली. रेल्वे सोबत महिला फरफटत गेली. पुन्हा आरपीएफ जवानाने पुढे धाव घेत महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.

पहा थरारक घटनेचा व्हिडिओ 

हा व्हिडिओ व्हायरल होताच, आरपीएफ जवानांचे नेटकरी कौतुक करत आहे. धाडसी रेल्वे पोलिसाच्या मदतीने महिलेचे प्राण वाचले. महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif