Satara: साताऱ्याच्या मेरुलिंग-मेढा घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी
तर, 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
साताऱ्याच्या (Satara) जावळी तालुक्यातील मेरुलिंग-मेढा (Meruling-Medha Ghat) घाटात कार दरीत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केला. या अपघातात कार पूर्ण चेपल्याने दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना खूप परिश्रम घ्यावे लागले आहेत. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती व किराणा सामना आणण्यासाठी कार मेढ्याकडे जात होती. या वाहनात एकूण आठ जण होती. पंरतु, मेरुलिंग-मेढा या घाटात एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे देखील वाचा-COVID-19 Death In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्युतांडव; राज्यात गेल्या 3 दिवसांत 2 हजार 17 रुग्णांचा मृत्यू
भिवंडीतील (Bhiwandi) मुंबई- नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik highway) एलपीजीग गॅस टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक (Road Accident) दिल्याची घटना काल घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही शनिवारी (25 एप्रिल) सायंकाळी घडली आहे. दरम्यान, टॅंकर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच टॅंकर चालकाचाही शोध घेतला जात आहे.