IPL Auction 2025 Live

Mumbai News: बागेत खेळताना शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, सोसायटीत चार सदस्यांवर गुन्हा दाखल, गोरेगाव येथील घटना

एका नऊ वर्षाच्या मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे.

Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलाचा विजेचा झटका (Electric Shock) लागून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी शनिवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीतील चार जणांविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- फनफेअरमध्ये खेळत असताना विजेचा झटका लागून नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घडली आहे. गोरेगाव पूर्व येथील आर्यवीर सोसायटीच्या तळमजल्यावर बागेत ही घटना घडली. बागेत खेळण्यासाठी मुले जमा झाली होती. बागेत विजेच्या तारांचा संपर्क आल्याने मुलाला जोरात शॉक लागला. यात तो बेशुध्द झाला. या घटनेची माहिती त्याचा वडिलांना देण्यात आली. अजय चौधरी असं त्याच्या वडिलांचे नाव आहे.

वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. लाईफलाइन रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मुलगा गमावल्याचा धक्का आणि दु:खामुळे अजय यांनी पोलिसांना तत्काळ जबाब दिला नाही. त्यामुळे त्यांनी काल उशिरा 13 एप्रिल रोजी त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि काळजीवाहू यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ए) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या अहवालात सोसायटी सदस्यांची नावे नाहीत.