Hingoli Shocker: महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयात केला आत्महत्याचा प्रयत्न, हिंगोलीतील खळबळजनक घटना

हिंगोलीमध्ये एक महिला पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस मुख्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Poison | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Hingoli Shocker: महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये एक महिला पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस मुख्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर आले आहे. पोलिस कर्मचारीने विष प्राशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या भयंकर घटनेमुळे हिंगोल पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना (२२ मार्च)  शुक्रवारी रोजी घडली आहे. (हेही वाचा- लखनऊमध्ये मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; केस ओढत, काठीने जोरदार मारहाण,

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली बबनराव थोरात असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिला कंटाळून गेली होती त्यामुळे तीनं आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नांदेड पोलिस दलात वैशाली थोरात या कर्तव्य बजवत असल्याची माहिती हिंगोली पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर वैशाली यांच्यावर विरोधात आता शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीच्या पोलिस मुख्यालयातील भरोसा सेलमध्ये वैशाली या महिला पोलिस कर्मचाऱ्याने पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले होते. यांच्या या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. आपल्याला न्याय मिळत नाही त्यामुळे तीने कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात वैशाली यांच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif