Mumbai News: 22 वर्षीय तरुणीची राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या, गोरेगाव येथील घटना

मुंबईतील गोरेगाव येथील परिसरात एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai News:  मुंबईतील गोरेगाव येथील परिसरात एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे. तरुणीने आत्महत्या का केली याचं नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान तरुणांमध्ये नैराणामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस आले आणि तपास सुरु केला. ही घटना दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रिझोल्यूशन (एडीआर) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.पोलिसांना रात्री ९च्या सुमारास आत्महत्येची माहिती मिळाली.( हेही वाचा- पत्नीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचे जडले व्यसन, त्रासलेल्या पतीने केली आत्महत्या)

तरुणीच्या घरी कोणी नसताना तीनं टोकाचे पाऊल उचलले आहे. तिचं कुटुंब बाहेरगावी गेले होते. दरम्यान ते परतले आणि घरचा दरवाजा ठोकला, परंतु तरुणीने बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते चिंतेत आले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. त्यांची मुलगी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली, या घटनेची माहिती रात्री उशिरा पोलिसांना देण्यात आली. पोलिस कुटुंंबाकडून चौकशी करत आहे. तरुणीने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif